Monday, December 17, 2007

उलटी टीप (Stem Stitch)

कापडावर पेन्सीलने एक सरळ रेघ काढुन घ्या. आधी सांगितल्याप्रमाणे ही रेघ रिंगच्या मधोमध येईल अशी रिंग लावुन घ्या. सुईमध्ये २ पदरी रेशीम ओवुन घ्या. आता डिझाईनच्या एका टोकाला कापडातुन सुई वर काढा. सुई जिथुन वर काढली आहे त्याच्यापुढे साधारन ३-४ मिलिमीटर अंतरावर रेघेवर सुई कापडामधे खाली टोचा. सुई पूर्ण खाली न घालता ती कापडातुन मागच्या बाजुला खालील फोटो मधे दाखवल्याप्रमाणे वर काढा. पुढचा टाका असाच घालत पुढे जावा व राहीलेले डिझाईन पूर्ण करा.



उपयोग -
या टाक्याचा उपयोग फुला-पानांचे देठ, डिझाईनच्या आउटलाईन्स करण्यासाठी होतो.

Variation -

एका रंगाने उलटी टीप घालुन त्यावर दुसर्‍या रंगाने त्या घातलेल्या टाक्यांवर वरच्यावर पीळ घालणे.




इथे पहा : http://www.embroiderersguild.com/stitch/stitches/stem.html

No comments: