गहुटाक्यासाठी कापडावर खालील प्रमाणे डिझाइन काढा. आता फुलाच्या पाकळिच्या आतील टोकावर सुई कापडातुन वर काढा. आता परत सुई जिथून वर काढली तिथेच खाली तोचा पण पूर्ण्पणे खाली घालू नका. त्याच पाकळीच्या बाहेरील टोकातून सुई कापडातुन वर काढून दोरयाने सुईखालुन वेढा घ्या आणि सुई पूर्ण्पणे कापडाबाहेर काढा. पण दोरा ओढुन ना घेता थोडा सैल ठेवून टाका गव्हासारखा टपोरा दिसेल असा सैल ठेवा. आणि सुई त्या वेढ्यापलिकडे कापडात पूर्णपणे कापडातुन खाली घाला आणि अशाच प्रकारे सगळे फूल पूर्ण करा.




साखळी -
कापडावर एक सरळ रेघ डिझाइन म्हणून काढून घ्या. त्या रेघेच्या एका टोकातून सुई वर कढा आणि पहिला टाका गहुटाक्याप्रमाणे घालून घ्या. साखळीची दुसरीकडी म्हणजे पण एक गहुटाकच असतो पण शेवटी सुई कापडातुन खाली घालतो त्याऐवजी पुढचा गहुटाका घालत डिझाइन पूर्ण करायचे आहे आणि सगळ्यात शेवटी सुई कापडातुन खाली घालून गाठ घालायची आहे.


डबल साखळी -
कापडावर एक रेघ डिझाइन म्हणून काढून घ्या. साखळीचा पहिला टाका घालून घ्या. पुढचा टाका आता ह्या पहिल्या टाक्याच्या शेजारीच घालावायाचा आहे. त्यासाठी सुई परत पहिल्यMदा जिथे वर काढली होती त्याशेजारीच परत खाली तोचा आणि पहिल्या साखळीच्या शेजारी परत कापडातुन बाहेर काढा. आता परत सुईभोवती दोरयाचा वेढा घ्या. दोन गहुटाके शेजारी काढल्याप्रमाणे दिसेल. आता पुढचा टाका ह्या दुसर्या कडीच्या डोक्यावर घालून त्याशेजारचा पहलिया साखळीच्या डोक्यावर घालत घालत डिझाइन पूर्ण करायचे आहे.


नागमोडी साखळी -
यासाठी एक सरळ रेघ डिझाइन म्हणून काढून घ्या. आता साखळीचा पहिला टाका घालताना डिझाईन्च्या रेघेवार सुई वर ना काढता थोडी त्या रेघेच्या डाव्या बाजूला काढावी आणि नेहेमीप्रमाणे साखळिची कडी पूर्ण करावी. दुसरी कडी घालताना सुई रेघेच्या उजवीकडे काढून पूर्वीप्रमाणेच कडी पूर्ण करावी. असेच एकदा डाविकडे एकदा उजवीकडे करत नागमोडी साखळी पूर्ण करावी.

2 comments:
मिनोती, अजून सुरुवात आहे म्हणून एक सुचना- यात प्रतिसादांमध्ये जे पण शंका/प्रश्न विचारले जातील, त्यांना तू जी उत्तरे/स्पष्टीकरणं देशील ती प्रतिक्रियेच्या पानावर न देता, मुख्य पानावरच (पाहिजे तर त्या त्या प्रश्नाचा सन्दर्भ देऊन) दे. म्हणजे सगळं एकत्र राहील.
Thanks GD! Nice Idea!
Post a Comment