या वर्षात मी बरेच उद्योग हातात घेतले आणि पूर्ण देखिल केले. भारतभेटीत कोणी केलेल्या साड्या, ड्रेसेस वगैरे पाहिले आणि लगेच हात सुर्सुरायला लागले. साडी भरुन पूर होणे शक्य नव्हते म्हणुन मग टॉप, ड्रेस वगैरे भरायचे ठरवले साहित्याची जुळवाजुळव केली आणि करायला घेतले. भारतवारीमधे त्यातले ९०% काम पूर्ण केले आणि उरलेले इथे आल्यावर लगेचच. त्यातले बरेच कांथावर्क आहे. हा एक प्रकार माझ्या अतिशय आवडीचा. मोठे मोठे डिझाईन भरता येते. वेगवेगळ्या टाक्यांचा कल्पक वापर करता येतो.
आज थोडे कांथावर्कबद्दल - हे काम बंगालभागात बरेच केले जाते. प्लेन सिल्कची साडी आणि त्यावर उठावदार रंगाने भरलेले डिझाईन सुंदर असते. पूर्ण डिझाईन बारिक धावदोर्याने भरले जाते. अगदी पाने, फुले, पाकळ्या, असले तरी पूर्ण भरगच्च धावदोर्याने भरले जाते. वेगवेगळे रंग किंवा एकाच रंगाने हे काम करतात. शाईसारख्या निळ्या रंगाच्या साडीवर अथवा ड्रेसवर ऑफव्हाईट रंगाने केलेले काम अप्रतीम दिसते तसेचगर्द हिरव्या रंगावर पिवळ्या, गुलाबी, तपकिरी, काळ्या रंगाचे काम सुंदर दिसते.
नविन सुरुवात करायची असेल तर काश्मिरी टाक्यासाठी लागणारे कोणातेही डिझाईन कांथासाठी वापरु शकता. धावदोरा अगदी बारिक घालायचा, लहान पाकळ्या, गोल असतील तर सॅटीन वापरायचा. एका रंगात किंवा वेगवेगळे रंग वापरुन डिझाईन पूर्ण करायचे.
7 comments:
तुला या ब्लॉगवर पुन्हा लिहीताना पाहून आनंद झाला. मला भरतकामातलं मुळीच काही येत नाही, पण तुझ्या कलाकुसरीचे फोटो पाहून प्रचंड कौतुक वाटतं. इथेही लिहीत रहा अधून मधून. मी कधी याच्या वाटेला जायचं ठरवलं तर तुझ्या ब्लॉगचा आधार लागेलच! :)
BTW, तुझा तो ’माझा व्यवसाय, माझा छंद’ मधला लेख इथेही टाक ना परवानगी असेल तर. संकलीत राहील आणि जास्त जणांना वाचता येईल private नसल्याने.
surekh!
सुंदरच झालेय. मला फार फार हौस आहे. कांथावर्क जमेल का आपल्याला, पण आता प्रयत्न करेन.
एप्रिलनंतर ब्लॉग वेग घेईल म्हणालात, पण बराच वेळ लागला. आज तुमची ब्लॉग पोस्ट पाहून खूप बरं वाटलं.
Nice embroidery work.......I too love to do craft work....
Too good!!! You are a great artist!!!
खुप सुंदर!!!! अप्रतिम !!
Post a Comment