Friday, December 25, 2009

टोपी
अलिकडे एका मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला काय द्यावे असा विचार चालला होता. अगदी ड्रेस, पुस्तक, मिक्सर, स्वेटर इत्यादी प्रकार शोधुन पाहिले. पण एकही गोष्ट मनासारखी वाटेना. एकाचा रंग आवडला तर दुसर्‍याचा पॅटर्न असे काहिसे होऊन सगळे बाद ठरवण्यात आले. असाच शोध चालु असताना मला एक मैत्रिण भेटली जी स्वेटर वगैरे खुप करते. एकावेळी ३- प्रोजेक्ट तरी हातात असतातच. तिच्या सल्ल्याने आणि आग्रहाने मी एक टोपी करायला घेतली. रॅव्हलरी नावाची एक साईट आहे तिथे माझी नाव नोंदणी केली. नुपुरच्या ब्लॉगमुळे आणि देसीनिटरच्या ब्लॉगमुळे तिथे माझी नाव नोंदणी केली आणि एक मस्त सोपा पॅटर्न मिळवला.सुरुवात केली आणि लक्षात आले की घेतलेला पॅटर्न, सुया आणि लोकर खुपच किचकट आहे.परत येरे माझ्या मागल्या करत शोधमोहिम सुरु केली. यावेळी मात्र लोकर साधी अ‍ॅक्रिलिक प्रकारची घेतली कारण तिला धुणे, वापरणे वगैरे सोपे जाईल म्हणुन. पॅटर्न पण लगेच मिळाला. सुरुवात केल्यावर लगेचच जाणवले की हे पटकन होणार आहे. तसेच झाले ११ इंच उंचीची टोपी अवघ्या दीड दिवसात पूर्ण केली. या टोपीची वीण अगदी सोपी आहे. जाड लोकरीमुळे खुलुन दिसते.
मी खालील पॅटर्न जसाच्या तसा वापरला -

http://www.knitlist.com/95gift/simphat.htm

(Above pattern is gone so adding another link where you can find this pattern - http://www.wikihow.com/Knit-the-Mistake-Rib-Pattern)