Sunday, January 6, 2013

Cowl

Cowl या नावाचा एका स्कार्फ सारखाच पण छोटा, गळ्याबरोबर घातला जातो. गेल्या वर्षी एका मैत्रिणीसाठी गिफ्ट म्हणुन केला. कितपत उपयोगाचा पडेल याची कल्पना नव्हती. कमी थंडीच्या वेळी फक्त गळ्याला थंडी वाजू नये म्हणुन कोटच्या आत घालायला तिला खूप छान वाटला. तिला आवडला हे पाहून मी माझ्यासाठी एक केला या वर्षी. माझा थोडा लांब झालाय पण छान दिसतो.

मैत्रिणीच्या cowl चा pattern इथून घेतला आहे - http://www.luvinthemommyhood.com/2010/10/frosted-glow-cowl-pattern-with-guest.html

या मध्ये मी कोणताही बदल केला नाही. फक्त बटण लावताना कडेला न लावता खाली लावले.

~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~.~

मी माझ्यासाठी बनवला तो pattern मुळचा इथला आहे - http://www.purlbee.com/hand-knit-lace-scarf/2008/12/2/very-special-scarf-lovely-leaf-lace.html

माझ्याकडे फक्त १९० यार्ड लोकर होती पण मला वरचे डिझाईन खूपच आवडले होते म्हणुन मग मी थोडे बदल करून करायचे ठरवले.
३१ टाके घातले. दिलेल्या डिझाईन प्रमाणे ६ pattern घातले. त्याच्यानंतर साधारण २ इंच उलट-सुलट विणून सगळे टाके दुसऱ्या सुईवर काढून ठेवले. असाच अजून एक भाग करून घेतला.

आता दोन भाग एकमेकांना जोडण्यासाठी grafting/kitchener stitch चा वापर केला.


Kichener Stitch tutorial इथे मिळेल - http://www.youtube.com/watch?v=I7jIzwO5Nv4

No comments: