Wednesday, February 8, 2012

थंडीपासून बचाव: स्कार्फ

गेल्या महिन्यात एका मैत्रिणीकडे जाण्याचा योग आला. मी रहाते त्या प्रदेशात थंडीच्या दिवसात बर्फ पडत नाही पण पाऊस, वाऱ्यामुळे वातावरण बऱ्यापैकी थंड होते. ही मैत्रिण मात्र बर्फाळ प्रदेशात रहाते. रोजचा साधारण ४-५ इंच बर्फ असू शकतो वगैरे असे तिच्याशी बोलताना समजले होते. पण ही 'मी' म्हणणारी थंडी नक्की असते कशी याची अस्मादिकाना काहीही कल्पना नव्हती. मैत्रिण खूप दिवसांपासून बोलावत होती आणि मला पण कामामधून थोडा बदल हवा होता. धाडस करून एकदाचे तिकीट काढले. 

मी तिच्याकडे जाण्याच्या आदल्या आठवड्यापर्यंत त्यांच्याकडे एकदम सुरेख म्हणण्याइतके वातावरण होते. पण त्या वातावरण नामक देवालादेखील ही बाई जाणारच म्हणतेय तर थंडी दाखवूनच सोडूयात असे वाटले असावे बहुदा. नेमकी त्या २-३ दिवसात थंडी पडेल असे हवामान खात्याने भाकीत केले. बर आता तिकीट हातात होते आणि जाण्याची मानसिक तयारी देखील. संपूर्ण सुसज्ज होऊन मी एकदाची विमानात बसले. 

तिथे जायचे म्हणून केलेया तयारी मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक होता साधारण एक वर्षापूर्वी करायला घेतलेला पण थंडी संपली म्हणून बाजूला पडलेला एक स्कार्फ. तो पूर्ण करून तिथल्या थंडीत वापरायचाच असे मनाशी पक्के ठरवले होते. त्याप्रमाणे जाण्याआगोदर १ आठवडा असताना  स्कार्फ पूर्ण केला. यासाठी लोकर खरेदी केली तेव्हाच त्याच्यासाठी design विकत घेतले होते. त्याबरहुकूम स्कार्फ पूर्ण केला. आणि तिथल्या 'माझ्यादृष्टीने' कडाक्याच्या थंडीत मला त्याचा खूपच उपयोग झाला. 

हे आहेत त्याचे काही फोटो. 




हा Pattern मी विकत घेतलेला आहे. त्यावर ज्याने तो बनवला त्याचा कॉपीराईट आहे/असतो.  त्यामुळे तो इथे शेअर करणे बरोबर होणार नाही. या पानावरचा Easy Lace Scarf मी केला आहे. 

2 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

सुंदर आहे स्कार्फ.

Bhavna said...

So lovely!