Wednesday, December 26, 2007

फेदर स्टिच

एकेरी फेदर स्टिच

डिझाईनसाठी एक रेघ काढुन घ्या. आता रेघेच्या एका टोकाकडे सुई कापडातुन वर काढा. आता सुई रेघेच्या उजवीकडे आणि मूळ सुईपासुन थोडी वरच्या बाजुला कापडात घालुन सुईचे टोक रेघेवर काढा आणि दोरा सुईखाली राहील असा ठेवुन सुई ओढा. आता पुढचा टाका रेघेच्या डाव्या बाजुला आणि आधीच्या टाक्याच्यावर थोडी वर कापडात खाली घालुन रेघेवर काढावी आणि दोरा सुईखाली ठेवावा. असे एक टाका उजवीकडे एक टाका डावीकडे असे करत रेघ पूर्ण करावी.

Feather Stitch 1

Feather Stitch 2

Feather Stitch 3


उपयोग - हा टाका डेकोरेटीव्ह स्टीच म्हणुन उपयोग करु शकता. तसेच नाजुक घातला तर लहान लहान पानांसाठी पण वापरता येतो. खालील फोटोमध्ये पाने कशी करावीत ते दिले आहे.

Feather Stitch Leaf

Feather Stitch Leaves
दुहेरी फेदर स्टीच

हा टाका वरील प्रमाणेच घालायचा आहे फक्त एक बदल आहे तो म्हणजे उजवीकडे एका शेजारी २ आणि डावीकडे एकाशेजारी २ असे टाके घालत डिझाईन पूर्ण करायचे आहे.

Double Feather Stitch 1

Double Feather Stitch 2

Feather Stitch side by Side
उपयोग - ह्या टाक्याचा उपयोग पण डेकोरेटीव्ह स्टीच म्हणुन केला जातो. तसेच नाजुक जरा उन्च गवत वगैरे दाखवण्यासाठी केला जातो.

5 comments:

पूनम छत्रे said...

सुरेख काम हाती घेतलयस कराडकर! :)
मीही एक मागणी करते.. कधीतरी at appropriate time सुयांबद्दलही लिही.. म्हणजे अगदी बारिक सुई कधी, थोडी जाड सुई कधी वापरायची. तसंच, एकेरी, दुहेरी वगैरे रेशीम कधी वापरायचं? साध्या embroidery साठी सहसा दुहेरी रेशीम वापरतो ना?

Karadkar said...

Poonam, dein nakkI :)

Unknown said...

mala tumcha blog khup aawadala. mala design madhe taake che combination have aahe.
Ani fether stich thodi detail madhe explain karal ka? mala neat kalal nahi. mhanaje fly stich and fether stitch madhe mi hara confuse zale aahe

Karadkar said...

dipali, design kase aahe to photo kuthe iupload kela tar neet combination sangata yeil. tyabarobar konate take neet jamatat va ghalayala avadateel te pan sanga. tyaanusar madat karane sope jail.

lavakarach fly stitch dein tyachbarobar farak sangayacha praatn karen.

Unknown said...

mala fether stich parat neat samajun hava aahe.