तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुखाची, समॄद्धीची जावो. या दिवाळी निमित्ताने तुमच्याकडून एखाद्या कलेची जोपासना होवो ही सदिच्छा.
मी 'हितगुज दिवाळी अंक' या मायबोलीच्या दिवाळी अंकात कर्नाटकी कशिद्यासंदर्भात एक लेख लिहीला आहे. तो इथे पहायला मिळेल -
http://vishesh.maayboli.com/node/877
तुम्हाला लेख कसा वाटला, चित्रफीत कशी वाटली हे जरूर कळवा.
Thursday, November 4, 2010
Friday, December 25, 2009
टोपी
अलिकडे एका मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला काय द्यावे असा विचार चालला होता. अगदी ड्रेस, पुस्तक, मिक्सर, स्वेटर इत्यादी प्रकार शोधुन पाहिले. पण एकही गोष्ट मनासारखी वाटेना. एकाचा रंग आवडला तर दुसर्याचा पॅटर्न असे काहिसे होऊन सगळे बाद ठरवण्यात आले. असाच शोध चालु असताना मला एक मैत्रिण भेटली जी स्वेटर वगैरे खुप करते. एकावेळी ३- प्रोजेक्ट तरी हातात असतातच. तिच्या सल्ल्याने आणि आग्रहाने मी एक टोपी करायला घेतली. रॅव्हलरी नावाची एक साईट आहे तिथे माझी नाव नोंदणी केली. नुपुरच्या ब्लॉगमुळे आणि देसीनिटरच्या ब्लॉगमुळे तिथे माझी नाव नोंदणी केली आणि एक मस्त सोपा पॅटर्न मिळवला.
सुरुवात केली आणि लक्षात आले की घेतलेला पॅटर्न, सुया आणि लोकर खुपच किचकट आहे.परत येरे माझ्या मागल्या करत शोधमोहिम सुरु केली. यावेळी मात्र लोकर साधी अॅक्रिलिक प्रकारची घेतली कारण तिला धुणे, वापरणे वगैरे सोपे जाईल म्हणुन. पॅटर्न पण लगेच मिळाला. सुरुवात केल्यावर लगेचच जाणवले की हे पटकन होणार आहे. तसेच झाले ११ इंच उंचीची टोपी अवघ्या दीड दिवसात पूर्ण केली. या टोपीची वीण अगदी सोपी आहे. जाड लोकरीमुळे खुलुन दिसते.
मी खालील पॅटर्न जसाच्या तसा वापरला -
http://www.knitlist.com/95gift/simphat.htm
(Above pattern is gone so adding another link where you can find this pattern - http://www.wikihow.com/Knit-the-Mistake-Rib-Pattern)
Wednesday, November 11, 2009
कांथावर्कबद्दल थोडेसे
या वर्षात मी बरेच उद्योग हातात घेतले आणि पूर्ण देखिल केले. भारतभेटीत कोणी केलेल्या साड्या, ड्रेसेस वगैरे पाहिले आणि लगेच हात सुर्सुरायला लागले. साडी भरुन पूर होणे शक्य नव्हते म्हणुन मग टॉप, ड्रेस वगैरे भरायचे ठरवले साहित्याची जुळवाजुळव केली आणि करायला घेतले. भारतवारीमधे त्यातले ९०% काम पूर्ण केले आणि उरलेले इथे आल्यावर लगेचच. त्यातले बरेच कांथावर्क आहे. हा एक प्रकार माझ्या अतिशय आवडीचा. मोठे मोठे डिझाईन भरता येते. वेगवेगळ्या टाक्यांचा कल्पक वापर करता येतो.
आज थोडे कांथावर्कबद्दल - हे काम बंगालभागात बरेच केले जाते. प्लेन सिल्कची साडी आणि त्यावर उठावदार रंगाने भरलेले डिझाईन सुंदर असते. पूर्ण डिझाईन बारिक धावदोर्याने भरले जाते. अगदी पाने, फुले, पाकळ्या, असले तरी पूर्ण भरगच्च धावदोर्याने भरले जाते. वेगवेगळे रंग किंवा एकाच रंगाने हे काम करतात. शाईसारख्या निळ्या रंगाच्या साडीवर अथवा ड्रेसवर ऑफव्हाईट रंगाने केलेले काम अप्रतीम दिसते तसेचगर्द हिरव्या रंगावर पिवळ्या, गुलाबी, तपकिरी, काळ्या रंगाचे काम सुंदर दिसते.
नविन सुरुवात करायची असेल तर काश्मिरी टाक्यासाठी लागणारे कोणातेही डिझाईन कांथासाठी वापरु शकता. धावदोरा अगदी बारिक घालायचा, लहान पाकळ्या, गोल असतील तर सॅटीन वापरायचा. एका रंगात किंवा वेगवेगळे रंग वापरुन डिझाईन पूर्ण करायचे.
Sunday, July 27, 2008
डिनर नॅपकिन्स
एका मैत्रीणीला काहीतरी गिफ्ट द्यावे असे खुप मनात होते पण काय द्यावे ते सुचत नव्हते. त्यच दरम्यान तिच्याकडे डिनरला गेले असताना प्लेन डिनर नॅपकिन्स पाहीले. तिला जरा घाबरतच विचारले की भरत्काम करून देऊ का? साधे सोपे काहीतरी करायचे होते अचानक मासे भरावेत असे वाटले लगेच डिझाईन करून चापून ठेवले. साधारण २ तासात पूर्ण सेट तयार झाला. त्यातल्या दोन नॅपकिन्सचा हा फोटो
Dinner Napkins
एका नॅपकिनचा थोडा डिटेल फोटो -
Close look at the fishes!
हे पण संपूर्ण डिझाईन कांथावर्कनेच केले आहे.
एका नॅपकिनचा थोडा डिटेल फोटो -
हे पण संपूर्ण डिझाईन कांथावर्कनेच केले आहे.
कांथावर्क
ब-याच दिवसांपासून हा फोटो इथे टाकायचा म्हणून ठरवला होता आज वेळ मिळाला. साधा प्लेन शर्ट मिळाला विकत त्यावर काहीतरी कारागीरी करायची हुक्की आली. कांथावर्क केले कारण सोपे आणि उठावदार दिसते म्हणून. शर्टच्या बाह्या रँगलन प्रकारच्या असल्याने डिझाईन छापणे आणि भरणे सोपे गेले. पिवळ्या रंगाच्या कार्बनने डिझाईन केले. डेनिम ब्लु रंगाने कांथावर्कने विणले. साधरण ४५ मिनीटात 'कस्ट्म शर्ट' तयार!
Kantha Work
Thursday, March 20, 2008
क्षमस्व
सध्या मला ऑफीसमधील काम आणि इतर कारणांमुळे नमुने करुन फोटो काढुन इथे ते नीट लिहिणे शक्य होत नाही. मला लिहायचे म्हणुन लिहिणे आणि थातुर-मातुर काहीतरी लोकांसमोर ठेवणे आवडत नसल्याने हा उपक्रम थोडे दिवस थांबवला आहे. जेव्हा जमेल तेव्हा लिहुन ठेवते आहेच पण सगळे नीट जमुन पोस्ट करायाला थोडा वेळ जाईल असे वाटतेय.
साधारण एप्रील महिन्याच्या सुरुवातीला हा ब्लॉग परत वेग घेईल असा माझा अंदाज आहे. तोपर्यंत तुम्ही धीर धराल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काही शंका/अडचणी असतील तर नक्की लिहा, मदत करायचा प्रयत्न जरूर करेन.
तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल अनेक धन्यवाद.

Wednesday, January 23, 2008
गाठीचा टाका
गाठीचा टाका
गाठीचा टाका घालण्यासाठी काही गोष्टी लक्शात ठेवणॅ जरूरीचे आहे. गाठीच्या टाक्याला मोठे मोठे डिझाईन असावे. हा टाका शक्यतो पडद्यासाठी, बेडकव्हर वगैरेसाठी वापरावा. कापड शक्यतो कॉटनचे आणि सुई जाड असावी. भरतकामासाठी शक्यतो ४ ते ६ पदरी रेशीम वापरावे.
डिझाईनसाठी एक रेघ काढुन घ्या. जाड सुईमध्ये ६ पदरी रेशीम ओवुन घ्या. रेघ उभी दिसेल अशाप्रकारे रिंग समोर धरा. आता रेघेच्या खालच्या टोकाला सुई कापडातून वर काढा. साधारन ३-४ मिलीमीटर अंतरावर सुई रेघेवर कापडात खाली घाला आणि साधरण २ मिलीमीटर अंतरावर रेघेच्या डाव्याबाजुला कापडातुन पूर्ण वर काढा. आता सुई आत्ता आपण घातलेल्या धाग्याच्या खालुन पण कापडात आत न घालता उजवीकडुन डावीकडे घालायची आहे. यामुळे आधीच्या टाक्यावर एक फुली घातल्याप्रमाणे दिसेल. आता या फुलीच्या वरच्या भागात पहीला जो टाका टाकला होता त्याखालुन पुन्हा सुई घाला पण कापडात टोचु नका. त्या सुईखाली मुख्य धाग्याने गहु टाक्याला घालतो त्यापद्धतीने वेढा घाला. सुई हलक्या हाताने पूर्ण वर काढा. असेच डिझाईन पूर्ण करा.
Knot -1
Knot - 2
Knot - 3
Knot - 4
Knot - 5
Knot - 6
Knot Design
उपयोग - मोठी मोठी फुले, पाने (साधारण ८-१० इंच व्यास असलेली) या टाक्याने आउटलाईनने भरतात. नाजुन कामासाठी हा टाका उपयोगी नसतो. परंतु नाजुन फुले थोडे कष्ट घेऊन ३ पदरी धाग्याने भरली तरी चांगले दिसु शकते. लहान मुलांच्या दुपट्यांवर वगैरे ३ पदरी धाग्याने कार्टून कॅरॅक्टर्स ह्या टाक्याने भरलेली मी पाहीलेली आहेत.

Subscribe to:
Posts (Atom)